इतिहास

इतिहास

               गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभु असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपतीअसेही नाव या देवतेस आहे. महाराष्ट्रात हे नाव विशेष लोकप्रिय आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक- शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो. याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचारित आहे.

 

 • श्री गणरायाची जन्मकथा :-

इतिहासात नमूद केल्याप्रमाणे  एकदा  पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली. पण काही वेळाने भगवान शंकर तिथे आले आणि आत जाऊ लागले. पहारेकऱ्याने त्यांना रोखले. तेव्हा भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकऱ्याचे शिरच उडवले.

पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकऱ्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्व आहे.

या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात. भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरूवात केली.

 • आणि गणराय झाले एकदंत :-

श्री कार्तवीर्याचा वध करून कृतार्थ झालेला परशुराम कैलासावर आला. तिथे त्याची सर्व गणांशी आणि गणाधीश गणपतीचीही भेट झाली. शंकरांच्या दर्शनाची इच्छा परशुरामाच्या मनात होती.परंतु शिव-पार्वतीची ती विश्रांतीची वेळ होती.     परशुराम गणेशाला म्हणाला, ‘अरे, मी परमेश्वराला नमस्कार करण्यासाठी अंतःपुरात जातो आहे. प्रणाम करून मी ताबडतोब परत येईन. ज्याच्या कृपेने मी कार्तवीर्य मारला, एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली, त्या जगदगुरूला शक्य तितक्या लवकर मला भेटलेच पाहिजे.’ हे ऐकताच गणेशाने सांगितले, ‘अरे, तू थोडा वेळ थांब.’
परंतु गणेशाचे बोलणे न मानता हातातील परशु सरसावून परशुराम निर्भयतेने आत जाण्यास निघाला, तेव्हा गणेशाने उठून त्याला अडविले. प्रेमाने, नम्रतेने बाजूस सरले. तेव्हा रागाने त्याला मारण्यासाठी परशुरामाने परशु उचलला. त्या धकाधकीत गणेश खाली पडला, पण तरीही स्वतःला सावरून धर्माला साक्ष ठेवून त्याने पुन्हा परशुरामाला आत न जाण्याबद्दल बजावले. तरीही परशुराम ऐकेना. तेव्हा मात्र स्वतःची सोंड कोटी योजने वाढवून त्यात त्याला गुरफटवून सारे सप्त लोक हिंडवून आणले. त्या भ्रमणाने शुद्ध गेलेला परशुराम जेव्हा सावध झाला तेव्हा गुरु दत्ताने दिलीले स्तोत्रकवच म्हणून त्याने गणेशावर स्वतःचा परशु टाकला. तो व्यर्थ करण्यासाठी स्वतःचा डावा दात गणेशाने पुढे केला. पर्शुचा वार फुकट गेला, पण तो गणेशाचा दात मात्र तुटून पडला.   सगळीकडे एकाच गोंधळ उडाला. सर्वजण जमा झाले. त्या गडबडीने शंकर-पार्वतीही बाहेर आली. सर्व समजल्यावर पार्वती परशुरामाला म्हणाली, ‘अरे, राम, तू ब्राह्मणवंशात जन्मलास आणि पंडितही आहेस. जमदग्नीचा पुत्र असून योगीराजांचा तू शिष्य आहेस. तुझी आई, मामा, आजोबा सारेच मोठे, मग तू कोणत्या दोषाने असा वागलास? अमोघ असा परशु घेऊन कोणीही  सिंहाला मारू शकेल, तसा तू परशु या गणेशावर चालविलास. तुझ्यासारख्या कोटी कोटी रामांना मारण्यास हा गणेश समर्थ आहे. अरे, हा गणेश कृष्णांश आहे. मोठ्या व्रताच्या प्रभावाने हा झाला आहे.

श्रीविष्णु म्हणाले, ‘हे देवी पार्वती, माझे थोडे ऐक. तुला हा गजानन आणि कार्तिकेय जसा, तसाच हा परशुराम आहे. यांच्यावरील स्नेहात आणि प्रेमात काहीच भेद नाही. ‘आजपासून तुझ्या या मुलाचे नाव एकदंतही पडले आहे. त्याची एकूण आठ नावे आहेत- गणेश, एकदंत, हेरंब, विघ्ननायक, लंबोदर, शूर्पकर्ण, गजवक्त्र, गुहाग्रज ही ती नावे होत.’ असे सांगून श्रीविष्णूंनी गणेशस्तोत्र कथन केले व म्हटले, ‘हे दुर्गे, याच्यावर या परशुरामावर रागावू नकोस. त्या गणेशाचे एकदंत हे एक नाव या घटनेनेच प्राप्त झाले आहे. त्या घटनेमधील पुत्रवत असलेल्या परशुरामाला अभय दे.’ तेव्हापासून श्रीगणेश एकदंत झाला.

 

 • अवतार
  उपपुराण मानल्या जाणार्या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण– ह्या दोन ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.
 • गणेश पुराण – गणेश पुराणात– उल्लिखित गणपतीचे चार अवतार सत्य, त्रेता, द्बापर व कलीयुगात अवतीर्ण झाले. हे होते –
  • महोत्कट विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप व अदिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला. या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.
  • मयूरेश्वर – हा षडभूज व श्वेतवर्णी अवतार आहे. वाहन मोर. त्रेता युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याच्या वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळेस मोर भाऊ कार्तिकेय यास दान केला.  गजानन – हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार. वाहन उंदिर. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला.अवतारसमाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली.
  • धूम्रकेतु – द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा. हा अवतार कलियुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते. विष्णूच्या कल्की अवतारावरून कल्पित.
 • मुद्गल पुराण – मुद्गल पुराणात– गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते. दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे. हे अवतार खालील प्रमाणे –
  1. वक्रतुण्ड – प्रथम अवतार.वाहन सिंह. मात्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध केला.
  2. एकदन्त – आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक. मूषकवाहन.अवताराचा उद्देश्य मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध।
  3. महोदर – वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप. बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक। मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.
  4. गजवक्त्र वा गजानन – महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला.
  5. लम्बोदर – ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक.वाहन मूषक. क्रोधासुराचा वध केला.
  6. विकट – सूर्याचे प्रतीक. कामासुराचा वध केला. वाहन मयूर.
  7. विघ्नराज – विष्णूचे प्रतीक.ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचे उद्देश्य.
  8. धूम्रवर्ण – शिवाचे प्रतीक. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक. वाहन घोडा.अभिमानासुराचा नाश केला.भारताबाहेर अनेक देशांमध्ये गणेशमूर्ती सापडल्या आहेत. प्राप्त गणेशमूर्ती द्बिभूज व मोदकभक्षणरत आहेत. हातात मोदकभांडे, कुर्‍हाड, अंकुश, पाश, दंड, शूळ, सर्प, धनुष्यबाण दिसतात. जावा बेटाच्या वाडा नामक जागी इसवीसनाच्या अकराव्या शतकातील बसलेल्या स्थितीतील मूर्ती मिळालेली आहे. या मूर्तीवर तंत्रमताचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. इंडोनेशियामध्ये इतरत्रही गणपतीच्या आसनस्थ मूर्ती मिळालेल्या आहेत. यात खिचिड येथे मिळालेली मूर्ती सर्वाधिक सुंदर आहे. ही मूर्ती चतुर्भूज असून , अभंगदेह , सुंदर डोळे, नागजानवेधारी, वाहन उंदीर अशी आहे. चारपैकी तीन हातात अक्षसूत्र, विषाण, मोदकभांडे आहे, चौथा हात अस्पष्ट आ

 

 • अमरावती आणि गणेशोत्सव :-

गणेशोत्सवाच्या स्वरूपात बदल होत असला तरी अमरावती परिसरातील बहुतांश गणेश मंडळांनी आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. बालगोपाळांचा सहभाग, दैदीप्यमान देखावे, या देखाव्यांतून गहन आशय मांडण्याची प्रगल्भता, वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकताना या क्षेत्रात शक्य तितके काम करण्याची ऊर्मी, ही अमरावतीच्या गणेशोत्सवाची वैशिष्टय़े म्हणता येतील.
उत्सवप्रिय अमरावतीत गणेशोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. कारण अमरावतीतील माणूस सोळा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणेशाला आपले आराध्य दैवत मानतो. त्यामुळेच कामानिमित्ताने इतर शहरात राहणारा नोकरदार लाडक्या गणरायाच्या या उत्सवासाठी दरवर्षी न चुकता आपापल्या गावात दाखल होत असतो. घराघरातून सजावट करून बाप्पाच्या आगमनाची तयारी केली जाते. वाजतगाजत डोक्यावर उचलून गणरायाला घरी आणले जाते. गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि रूढी आणि परंपरा जपत हा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो.

 • महाराष्ट्रातील गणेशोत्सव :-

महाराष्ट्रातील गणेशोत्सव गणपतीसंबंधित सर्वात मोठा उत्सव आहे. प्रतिवर्षी ऑगस्टमहिन्याच्या शेवटी वा सप्टेंबरमहिन्याच्या सुरुवातीस भारतीय पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थी पासुन सुरू होतो.हा उत्सव दहा दिवस चालतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मूर्ती विसर्जित केल्या जातात. पेशव्यांच्या काळात हा घरगुती उत्सव्याच्या स्वरूपात असण्याचे उल्लेख आहेत. पूर्वी केवळ घरगुती व्रत/उत्सव अशा स्वरूपात असलेल्या गणेश उत्सवास इ.स. १८९३ साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक स्वरूप दिले

 

 • भारताबाहेरील गणराय :-

भारताबाहेर अनेक देशांमध्ये गणेशमूर्ती सापडल्या आहेत. प्राप्त गणेशमूर्ती द्बिभूज व मोदकभक्षणरत आहेत. हातात मोदकभांडे, कुर्‍हाड, अंकुश, पाश, दंड, शूळ, सर्प, धनुष्यबाण दिसतात. जावा बेटाच्या वाडा नामक जागी इसवीसनाच्या अकराव्या शतकातील बसलेल्या स्थितीतील मूर्ती मिळालेली आहे. या मूर्तीवर तंत्रमताचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. इंडोनेशियामध्ये इतरत्रही गणपतीच्या आसनस्थ मूर्ती मिळालेल्या आहेत. यात खिचिड येथे मिळालेली मूर्ती सर्वाधिक सुंदर आहे. ही मूर्ती चतुर्भूज असून , अभंगदेह , सुंदर डोळे, नागजानवेधारी, वाहन उंदीर अशी आहे. चारपैकी तीन हातात अक्षसूत्र, विषाण, मोदकभांडे आहे, चौथा हात अस्पष्ट आहे.

 

 •  गणरायाची आरती :-

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नांची नुरवी; पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा| चंदनाची उटी कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट शोभतो बरा | रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना|

दास रामाचा वाट पाहे सदना| संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना|

जय देव जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

 

गणपतीच्या अवयवाचा आध्यात्मिक अर्थ :

गणपतीच्या प्रत्येक अवयवांचा आध्यात्मिक अर्थ लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे दिसून येते .गणपती एकदंत आहे.त्याचा डावा दात मोडलेला आहे .फक्त उजवा दात. तेवढाच दिसून येतो. या एकदंत शब्दाचे रहस्य मुद्रल पुराणात खालील श्लोकान उदद्धृत केले आहे .
एकशब्दात्मिका माया तस्या: सर्वा समृद्ध ||
भ्रांतीन्द मोहदं पूर्ण नाना खेलात्मकं किल ||
दत्त सत्तवरस्तत्र मायाचालक उच्चते ||
बिम्बेन मोहयुक्तेन स्वयं स्वानंदगोभवेत ||

याचा भावार्थ :
“एक” शब्द मायेचा वाचक असून “दंत” शब्द सत्ताधारक ,मायाचालक परब्रम्हाचा वाचक आहे. या “एकदंत” नावावरून गणपती प्रत्यक्षपणे सृष्टीसाठी मायेला प्रेरणा देणारा समस्त सत्तेचा आधारभूत अशा परभ्रम्हाचे अभिव्यक्त रूप आहे, असे ठरते.
गणपतीला हात “चार” त्यातील “तीन” स्वर्ग, मृत्यू पाताळ यातील अनुक्रमे देव ,मानव व नाग यांचे रक्षण करतात. “चौथा हात” केवळ भक्तांच्या कल्याणासाठी राखून ठेवलेला असतो. याला “वरदहस्त” म्हणतात. त्यांच्या एका हाती पाश, दुसऱ्या हाती अंकुश ,तिसऱ्या हाती भग्नदंत असतो. “पाश” भक्तांच्या “मोह” दूर करतो तर “अंकुश” विश्वाचे “नियंत्रण” करतो. “दंत” हा दृष्टांचे “निर्दालन” करतो.
गणपतीचे “कान” सुपासारखे मोठे आणि पसरट आहेत म्हणून त्याला “शुर्पकर्ण” म्हणतात. सुपाचे काम कोणते ? कोंडा दूर सारून ध्यानकण एकत्र करणे. धान्य हे भूशांच्या आवरणात असते. त्याचप्रमाणे ब्रम्ह हे जीवरुपात मायावच्छीन्न किंवा मायेशी एकरूप असून मलावरणाने आच्छन्न असते .हे आवरण एवढे प्रगाढ असते,कि त्यातून चैतण्याचा आभास मिळत नाही. अशा अवस्थेतून शूर्पकर्ण श्री. गणेशाची उपासना केली असता ती “मायेचा आवरण” दूर करण्यास समर्थ ठरते.
गणपती मूषकवाहन आहे. कोणतीही वस्तू कुरतडणे हा भूषकाचा जन्मसिद्ध स्वभाव,तो वस्तूंच्या  अंग प्रत्यंगाचे विश्लेषण ,विघटन करतो विश्लेषण हे मानवी जीवनात बुद्धीचे कार्य आहे. श्री गणेश हि बुद्धीची देवता आहे. ज्या ताक्रिक बुद्धीच्या बळावर वस्तुत्वाचा परिचय होतो, जिच्या मुळे वस्तूच्या सार-असार अशांचे पृथ:करण केले जाते, आणि जीच्याद्वारा वस्तूच्या अंत:स्थळा पर्यंत जाता,प्रवेश करणे शक्य होते,अशा बुद्धीचे प्रतिक म्हणून उंदीर गणपतीच्या पायाशी बसला आहे.
व्युप्तत्ती व अर्थ :-
     गण + पति. पती म्हणजे पालन करणारा . गण या शब्दाचे निरनिराळे अर्थ पुढे दिले आहेत.
अ . महर्षी पणिनिंनुसार :-    
     गण म्हणजे अष्टवसूंचा समूह होय .वसू म्हणजे दिशा , दिक्पाल किंवा दिक्देव. गणपति हा दिशांचा पति , स्वामी आहे. इतर देवता त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत. म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतिपूजन करतात. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या कि,ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो,ति तेथे येऊ शकते.
आ . निधटूकोशानुसार :-
गण म्हणजे जीवसृष्टीवर विधातक परिणाम करणार्या तीर्यकू (रज) किंवा विस्फुटीत (तम)लहरींचा समूह .त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा तो गणपति.
काही इतर नावे
अ . वक्रतुंड :-
वक्रमार्गाने (वाईट मार्गाने ) चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुंड.
आ . एकदंत किंवा एकशुंग :-
एकच सुळा अखंड असल्याने (दुसरा तुटलेला असल्याने ) हे नाव आहे . दोन सुळ्यांपैककी उजवीकडील सुळा अखंड असतो , तर डावीकडील सुळा तुटलेला असतो.उजवी बाजू ही सूर्यनाडीची आहे.सूर्यनाडी  हि तेजस्वी असल्याने अशा तेजस्वी बाजूकडील गणपतिचा सुळा कधीही खंड होऊ शकत नाही.एका अशा  बर्ह्याचा हा निर्देंशक आहे. दंतीन हा शब्द दृदर्शयति (म्हणजे दाखविणे ) या धातूपासून बनला आहे. एक अशा बर्ह्याची अनुभूती येण्याची दिशा दाखवितो तो, असाही त्याचा अर्थ आहे.
इ . चिंतामणी-
चिंतामणी हे गणपतीचे आणखी एक नाव आहे.क्षिप्त ,मूढ,विक्षिप्त,आकार्ग व निरुध्द अशा चीताच्या पाच भूमिका आहे. त्यांना प्रकाशित करणारा, तो चिंतामणी होय. चिंतामणीच्या भजनाने चींत्तपंचकाचा नाश होऊन पूर्ण शांतीचा लाभ होतो.
ई. मंगलमुर्ती :_
मं म्हणजे  परिपूर्ण व ग्लू-जयते म्हणजे शांत किंवा पवित्र करणे. जे आतून व बाहेरून पवित्र करणे ते म्हणजे मंगल. असे मंगल करणारी मूर्ती म्हणजे मंगलमुर्ती.महाराष्ट्रात ‘मंगलमुर्ती मोरिया’ असा जो गणपतीचा जयघोष करतात,त्यातील मोरिया हा शब्द चौडाव्या शतकात पुण्याजवळच्या चिंचवड येथे होऊन गेलेल्या प्रसिघ्द गणेश भक्त मोरिया गोसावी यांच्यानावातून घेतला आहे.देव भक्त अतूट नाते त्यातून लक्षात येते.