श्री . नीलकंठ गणेशोत्सव मंडळ

Posted on Posted in अमरावती जिल्हा

श्री . नीलकंठ गणेशोत्सव मंडळ ,नीलकंठ चौक ,बुधवार ,अमरावती
स्थापना वर्ष : १९४२

मंडळाचा इतिहास :

मंडळाची स्थापना १९४२ साली करण्यात आली. त्यावेळेस या पुढे मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव व्यायाम शाळा, शैक्षणिक प्रगती या सर्व गोष्टींचा विकास व्हावा या दृष्टीने स्थापना करण्यात आली. त्याप्रमाणे आजही या संस्थेची प्रगती सुरु आहे .मंडळातील गणेशोत्सवात धार्मिक दृश्य साकारण्यात प्राधान्य दिले आहे . त्याप्रमाणे तिरुपती दर्शन ,अष्टविनायक ,कोकिळा व्रत, सुवर्ण मंदिर (विल्लूर ), अक्षरधाम असे निरनिराळे देखावा सादर करण्यात आले आहे .तसेच व्यायामाच्या दृष्टीने आधुनिक व्यायामशाळा संस्थेजवळ असून संस्थेच्या मैदानावर कबड्डी ,क्रिकेट याचे भव्य आयोजन करण्यात येत असते तसेच शालेय दृष्टीकोनातून निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, भावगीत, देशभक्तीपर स्पर्धा यांसारख्या स्पर्धा दरवर्षी घेण्यात येतात .

मंडळाबाबत इतर माहिती :

नीलकंठ मंडळाद्वारे प्राथमिक व माध्यमिक शाळा चालविण्यात येतात तसेच शिशुमंदिर व पाळनाघर चालविण्यात येते .सांस्कृतिक समिती तर्फे दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये व्याख्याने, नाटक, एकांकिका भावगीत व इतर कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन होत असते. गेल्यावर्षी मंडळाने ‘नीलकंठ आयडल’ या गायनाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. तसेच मंडळातर्फे सर्व सामन्यांसाठी धर्मार्थ दवाखाना चालविण्यात येतो. मंडळाचे आधुनिक संगणक कक्ष आहे .

मंडळाच्या इतर लिंक्स:

मंडळाचा इ –मेल : नाही
मंडळाचा फेसबुक पेज : नाही
मंडळाची वेबसाईट : नाही