आझाद हिंद मंडळ, अमरावती

Posted on Posted in अमरावती जिल्हा

आझाद हिंद मंडळ, अमरावती

आझाद हिंद मंडळाची स्थापना स्वातंत्र्यकाळापूर्वी सन १९२८ रोजी झाली. पूर्वी या मंडळाचे नाव “रॉयल क्लब” असे होते. ह्या मंडळाची स्थापना ही युवकांना व जनसामान्यांना एकत्रित करणे व देशाच्या स्वातंत्र्याकरिता इंग्रजांविरोधात लढा देण्याकरिता झाली होती. भारताला स्वातंत्र्यनंतर “ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेने, त्यांच्याच आझाद हिंद सेनेतील कॅ. शाहनवाज खान यांच्या उपस्थितीत या मंडळाचे नाव “आझाद हिंद मंडळ” असे ठेवण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरक्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने गणेशोत्सवाच्या माध्यामाने युवकांचे व समाजाचे संगठन करून विविध क्षेत्रात अग्रेसर आहे.  या ८५ वर्षांमध्ये मंडळाने सांस्कृतिक क्षेत्रात ऐतिहासिक व सामाजिक नाटकांची स्वतःनिर्मित करून सादरीकरण केले. तसेच ज्वलंत विषयांवर परिसंवाद व नागरीविवाद आयोजित करून महाराष्ट्रातील नामवंत वक्ते मंडळाचे व्यासपिठावर आणून त्यांचे विचार समाजापर्यंत पोचविले. त्याचप्रमाणे कवीसंमेलन, ऑर्केस्ट्रा,नकलांचे कार्यक्रम, भावगीत, भक्तीगीत यासारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले. मंडळाचे गणेशोत्सावानिमित्य दरवर्षी “श्रीं” ची भव्य शोभायात्रा काढण्यात येते. गेल्या सात-आठ वर्षांपासून मंडळाने भव्य प्रमाणात देखाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये अक्षरधाम मंदिर, ताजमहाल,पद्मनाभ मंदिर, कोणार्क मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर याचा समावेश होतो.